सोलापूर : पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार या योजनेतील पहिला हप्ता केंद्र सरकारने राज्य सरकारला वितरित केला आहे. राज्यासाठी 305 कोटी रुपये मंजूर झाले असून यामध्ये राज्यातील ड वर्गातील महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना निधी मंजूर करण्यात आला आहे .सोलापूर महापालिकेला या वित्त आयोगातून आता 14 कोटी 22 लाख 63 हजार 750 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे . या 15 व्या वित्त आयोगातून सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या नगरपालिकांना किती पैसे मिळाले पहा..
- सोलापूर महानगरपालिका 14 कोटी 22 लाख
- बार्शी नगरपालिका एक कोटी 83 लाख
- पंढरपूर नगरपालिका एक कोटी 47 लाख
- करमाळा नगरपालिका 34 लाख 83 हजार
- सांगोला नगरपालिका 76 लाख 28 हजार
- अक्कलकोट नगरपालिका 58 लाख 71 हजार
- मंगळवेढा नगरपालिका 31 लाख 48 हजार
- मैंदर्गी नगरपालिका 18 लाख 33 हजार
- दुधनी नगरपालिका 16 लाख 54 हजार
- कुर्डूवाडी नगरपालिका 34 लाख 49 हजार
- माळशिरस नगरपंचायत 43 लाख 63 हजार
- मोहोळ नगरपंचायत 56 लाख 33 हजार
- माढा नगरपंचायत 31 लाख 78 हजार