सोलापूर दि. 21. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्वारंटाईन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात देण्यात येणा-या वैद्यकीय सुविधांची तपासणी करण्यासाठी सहायक शल्य चिकित्सक डॉ. मोहन शेगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नियुक्त केलेल्या या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी हेमंत निकम आणि सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचा समावेश आहे.
सोलापूर शहरामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र, केगांव, मंडळ प्रशिक्षण केंद्र, रेल्वे विभाग, रामवाडी, वाडिया हॉस्प्टिल, सोलापूर येथे क्वारंटाईन कक्ष स्थापन करण्यात आलेला आहेत. क्वारंटाईन कक्षामध्ये रुग्णांना पुरविण्यात येणा-या वैद्यकीय सुविधा, निवास, भोजन, रुग्णांच्या अडीअडचणी, समस्या व इतर अनुषंगिक बाबीं इत्यादींचा दैनदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या पथकास दिले आहेत.