सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एकूण अकरा झाली आहे त्यांच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्याच्या संपर्कात आलेली जय हॉस्पिटलमधील एका महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
तिच्या आणि मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 42 जणांचे अहवाल 16 एप्रिल रोजी जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त झाले यातील 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून दहा जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यातील एक व्यक्ती मृत व्यक्तीच्या संपर्कात आली असून उर्वरित नऊ व्यक्ती त्या महिलेच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या 12 वर पोहोचल्यामुळे सोलापूरकरांचे टेन्शन आता अधिकच वाढले आहे.