सोलापूर : सोलापूर शहरात बाहेरील उद्योग धंदे यावेत व्यवसाय उद्योग वाढवण्यासाठी व सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी मध्ये समावेश झाल्याकारणाने सोलापूर शहरांमध्ये विमानसेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे असून उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन विमानसेवेत येणारे अडथळे दूर करीत नाहीत व जाणून-बुजून कारवाई करीत नाही त्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद जवळील पूनम गेटवरसामोर धरणे आंदोलन करण्यात आले.
रविवारी अकरा वाजता प्रजासत्ताक दिनादिवशी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अजित शेटे व हनुमंत हुल्लोरी यांनी देशभक्तीपर गीत गाऊन अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. उच्च न्यायालय व काय त्याचा डीजीपीए यांच्या आदेशानुसार सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणीचे सोलापुरातील विमानसेवा सुरू होण्यासाठी अडचण येत असल्याने दोन महिन्यापूर्वी पाडकाम करावे असा आदेश देऊन सुद्धा जाणून-बुजून जिल्हा प्रशासन व महानगरपालिका प्रशासन कारवाई करीत नाहीत त्यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान होत असून लवकरच संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगर पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्याविरुद्ध आवमान याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांनी दिली.
सोलापुरातील उद्योग-व्यवसाय यांना फटका बसून अनेक सुशिक्षित युवक सोलापूर शहर सोडून पुणे मुंबई येथे स्थलांतरित होत आहेत. केंद्रशासनाच्या उडान योजनेअंतर्गत शिर्डी औरंगाबाद येथील विमानसेवा सुरू झाली असून सोलापुरात विमान सेवा सुरू होण्यास अडथळा ठरणारे बेकायदेशीर चिमणी लवकरात लवकर पाडून विमानसेवा सुरू करावी अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे सनी पाटु, महेश भंडारे, अजय कदम,संजय भोसले,किशोर कदम,शेरा शेख,सोमनाथ पात्रे,अभिजीत शिरके, अरविंद शेळके, संभाजी भोसले,अजित शेटे,सुरेश जगताप,रमेश लोखंडे पिराजी दळवी,नामदेव राऊत,चेतन चौधरी आशुतोष माने हनमंत हुल्लेरी आदी उपस्थित होते.