सोलापूर : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ यांनी रद्द ठरवले आहे. त्यामुळे आता सोलापूरचे महाराज असलेले खासदार आणि त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
तक्रार प्रमोद गायकवाड यांच्याकडे जात प्रमाणपत्र समितीने निकाल दिला आहे खासदार जयसिद्धेश्वर यांचा बेडा जंगम या जात प्रमाणपत्रावर प्रमोद गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता निवडणुकीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा आक्षेप फेटाळला होता त्यानंतर तक्रारदारांनी जात प्रमाणपत्र विरुद्ध जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीवर पंजाब फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी झाली होती मात्र निकाल राखून ठेवला होता त्याचा निकाल सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आला यामध्ये खासदार यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले आआहेत त्यामुळे आता भाजपच्या वतीने जय सिद्धेश्वर यांची खासदारकी वाचवण्यासाठी काय प्रयत्न होणार याकडे लक्ष लागले आहे.