सोलापूर : दरवर्षी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. यावर्षीच्या 8 व्या योग दिनानिमित आणि आजादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधीन असलेल्या सर्व विभागामध्ये योग अभ्यासाचे सराव करण्यात येणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, सोलापूर आणि योग सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १३ मे २०२२ रोजी सकाळी ५.४५ ते ०७.००पर्यंत शिवस्मारक, नवी पेठ, सोलापूर येथे एक दिवसीय योग अभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते.
या एक दिवसीय योग अभ्यासामध्ये योग प्रशिक्षक मनमोहन भुतडा यांच्याकडून सूर्य नमस्कार, योगासने आणि सामान्य योग प्रोटोकॉलचे सराव करून घेण्यात येणार आहे. तरी सर्व सोलापूरकरांनी या योग अभ्यासामध्ये मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले आहे.