सोलापूर : सेव्ह मेरिट सह नेशन ह्या संस्थेतर्फे गुणवत्तेच्या संवर्धनासाठी आणि त्याची महत्व लोकांना पटावी ह्या एका उदात्त हेतूने ९ फेब्रुवारी २०२० रोजी महाराष्ट्रातील जवळपास २५ शहरांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी “रन फॉर मेरिट” हे अभियान होणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील गुणवत्ता प्राप्त युवक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार ही यावेळी करण्यात येणार आहे.
तरी रविवार दि. ९ रोजी आयोजित रन फॉर मेरिट या दौडमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.विनायक देशपांडे यांनी केले आहे. सर्वांसाठी रु. १००, महावद्यिालयीन विद्यार्थीसाठी रु.५० व शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामुल्य नाव नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. सकाळी ७ वा. या दौडची सुरुवात होऊन रंगभवन चौक, सात रस्ता एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, मार्गे हरिभाई देवकरण प्रशालेजवळ समारोप होईल. या पत्रकार परिषदेस डॉ.संजय देशपांडे, डॉ.आर्दश मेहता, डॉ.विनायक देशपांडे, डॉ.साधना देशमुख, डॉ.प्रशांत औरंबादकर, सलाम.शेख, कमलकिशोर फोफलिया, प्रशांते तवकिरे, डॉ.सुधांषु कोठडिया आदी उपस्थित होते.