सोलापूर (शिवाजी सुरवसे) – सोलापुरात काल दुपारपासून आज सायंकाळपर्यंत 24 तासात दोन महिला रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे .यामध्ये मोहोळ तालुक्यातील पाटकुल मधील 26 वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. पाटकुल मधील त्या महिलेची पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली होती तिला जुळे मुले झाले असून त्यातील एक दगावले आहे. तिला कोरोनाची लागण झाल्यामुळे
24 एप्रिल रोजी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते उपचारादरम्यान
सोमवारी सकाळी 11 वाजता तिचे निधन झाले.
दुसरी महिला न्यू पाच्छा पेठेतील 65 वर्षांची असून रविवारी दुपारी तिला बारा वाजता सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि अवघ्या तासात दुपारी एक वाजता तिचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात तिची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. तिचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आली आहे.
कालपर्यंत सोलापुरात 128 कोरोना बाधित रुग्ण होते त्यामध्ये सोमवारी आणखी सात रुग्णांची भर पडली आहे .यामध्ये नईजिंदगी चौकातील दोन रुग्ण ,शास्त्री नगर, न्यू पच्चा पेठ ,देगाव ,भगतसिंह मार्केट गेंट्याल चौक आणि जोडभावी पेठ येथील प्रत्येकी एक अशा सात रुग्णांचा समावेश आहे. सद्य परिस्थितीमध्ये सोलापूरच्या रेल्वे हॉस्पिटल ,ESI हॉस्पिटल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 105 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 2258 जनाची टेस्ट घेण्यात आले असून त्यापैकी 135 जण पॉझिटिव आढळले आहेत. आणखी 257 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. होम कोरंटाइन’मध्ये मध्ये 2295 जण तर इन्स्टिट्यूशन कोरंटाकमध्ये 938 जण आहेत अशी माहिती सोलापूरच्या सिविल हॉस्पिटल ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.