सोलापूर : सोलापुरात कोरोना पॉझिटीव्ह ८२ असल्याचे एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य शासनाच्या प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले होते. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना संपर्क साधला असता त्यांनी हे आकडे चुकीचे असून सोलापुरात कोरोनाचे ६८ रुग्ण आहेत. मी काल जाहीर केलेली आकडेवारी बरोबर आहे, अशी महिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येस न्युज मराठीशी बोलताना दिली.
एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रमाकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत सोलापूर शहरात ७५ आणि ग्रामीण भागात ७ असे ८२ रुग्ण दाखवण्यात आले आहेत. व ५ जण मरण पावले अशी नोंद आहे. मात्र हे आकडेवारी चुकली आहे. मी आरोग्य विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांच्याशी बोललो आहे अर्ध्या तासात हे आकडे दुरुस्त करण्याचे त्यांनी मला सांगितले आहे असेहि जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६८ असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे उर्वरित ६२ जणांवर सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.