सोलापूर; सोलापूर शहरात आणखी एका 63 वर्षांच्या महिलेचा मृत्यू कोरोना मुळे झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. मृत पावलेली महिला ही सदर बाजार मधील असून तिला तीन मे रोजी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान तिचे चार मे रोजी निधन झाले असून तिची कोरोनाची टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आजवर कोरोना मृत्यू पावलेल्या यांचा काकडा 9 वर पोहोचला आहे.
मंगळवारी एकूण दहा जणांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये राहुल गांधी झोपडपट्टीमधील 2, दक्षिण सोलापुरातील उळे गावच्या एका व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एमआयडीसी नीलम नगर, एकता नगर ,विजापूर रोड वरील हुडको कॉलनी ,कामाठीपुरा, लष्कर सदर बझार, पोलीस मुख्यालय ग्रामीण आणि शास्त्रीनगर या प्रत्येक भागातील प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 145 वर पोहोचली असून आजवर नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. 24 जणांना आजवर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 112 जणांवर सोलापुरातील तीन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.