सोलापूर : डोणगाव रोड परिसरातील जुनी लक्ष्मी चाळीत राहणारे अनिल नागनाथ चांगभले ( वय पन्नास) यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
जुनी लक्ष्मी चाळ परिसरात बालवीर वाचनालय आहे या वाचनालयात अनिल हे शिपाई या पदावर काम करतात दरम्यान ते मधल्या वेळेत रिक्षाचालक म्हणूनही काम करतात. बुधवारी दुपारी रिक्षा घेऊन ते व्यवसाय करिता घरातून बाहेर पडले त्यांनी आपली रिक्षा वाचनालयाच्या समोरील रस्त्यावर उभी केली त्यानंतर त्यांनी वाचनालय उघडले. त्यानंतर त्यांनी वाचनालयाच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला.
साधारण पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा मुलगा कामानिमित्त त्या रस्त्याने जात होता त्यास वडिलांची रिक्षा रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आले त्याने आजूबाजूला चौकशी केली परंतु वडील कुठेच दिसून आले नाहीत त्यानंतर त्यांनी वाचनालयाचे दार ढकलून आत पाहिले त्या वेळी त्यांना अनिल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले त्यांनी इतर नातेवाईक व मित्रांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले परंतु उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
चौकट
अनिल यांना सावकाराकडून पैशाच्या कारणावरून नेहमी तगादा होता. लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या अडचणीत भर पडली होती परंतु सावकाराकडून पैशासाठी होणारा त्रास मात्र थांबला नव्हता याबाबत पोलिसात तक्रारी अर्ज दिला होता या अर्जावर अद्याप तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान बुधवारी त्यांच्या कपड्यात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये सावकारांची नावे असल्याची चर्चा आहे. याबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.