नवी दिल्ली : फुलराणी म्हणून ओळखली जाणारी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने भाजपात प्रवेश केला आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणाऱ्या सायना नेहवालने भाजपात प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. सायना नेहवालसोबत तिच्या मोठ्या बहिणीनेही यावेळी भाजपात प्रवेश केला. भाजपा कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सायना नेहवालचा भाजपा प्रवेश कार्यक्रम पार पडला. सायना नेहवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून प्रचार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सायना नेहवालच्या आधी अनेक खेळाडूंनी भाजपात प्रवेश केला आहे. पैलवान योगेश्वर दत्त आणि बबिता फोगाट यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे.
सायना नेहवालचा जन्म हरियाणाचा असून भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत तिचा समावेश आहेत. सायनाने ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकाची कमाई केली आहे. २०१५ मध्ये सायना नेहवाल जागतिक रॅकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरली होती. सध्या ती नवव्या क्रमांकावर आहे.