पंढरपूर : श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुळदगड आणि प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या शिफरशीनुसार पुळुज येथील आकाश मारुती नाळे यांची पंढरपूर तालुका संपर्कप्रमुखपदी म्हणून निवड करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुका प्रमुखपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करते वेळी बोलताना आकाश नाळे म्हणाले की, परिसरामध्ये विविध सामाजिक कार्यामध्ये माझा पुढाकार राहिलेला आहे. त्यातच आता मला पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख म्हणून निवड झाल्याने आणखी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.पंढरपूर तालुक्यांमध्ये संघ वाढीसाठी तसेच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
आकाश नाळे यांचे पंढरपूर तालुका संपर्कप्रमुख निवड झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय दुधाळ आणि पंढरपूर तालुक्याचे अध्यक्ष सतीश बनकर, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलाताई महाडिक, क्षीधर बिरजे,भिमा स. सा.का. संचालक रतिलाल गावडे,सरपंच शिवाजी शेंडगे, पांडुरंग ताटे, जि. प.प्रा.शाळा कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय पांढरे,बडुं शेख जाकिर मुलाणी आणि राजू माने यांनी अभिनंदन केले. त्यांच्या निवडीमुळे गावातील मित्र परिवारांनी त्यांचा सन्मान केला.