सोलापूर : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी सोहळा महाद्वार काला (प्रसाद) परंपरेने केला जातो. त्याला अधिकृत परवानगी देऊन काला प्रसाद करणे शासन जबाबदारी होती. पण तसे न घडता परंपरा सांभाळण्यात यावी म्हणून नामदास महाराज व हरिदास महाराज यांनी काला केला.जमाव बंदी कायदा अंतर्गत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचा तीव्र निषेध करत आहोत. ते सर्व गुन्हे ताबडतोब रद्द करण्यात यावे. मंत्री व अधिकारी फिरताना सोशल डिस्टन्स पाळतात का ? त्यांना नियम नाहीत का, लग्न, मयत ला 50 जणांना परवानगी असताना फक्त 50 जण आहेत. हे कधी पाहिलं आहे का ? मग हे नियम वारकरी परंपरेला का,त्यामुळे वारकरी परंपरा मोडीत काढण्याचा मोठा कट असल्याचे वाटते. आत्ता पर्यंतचे संतांचे योगदान विचारात घेऊन त्याअनुषंगाने असलेल्या परंपरेतील महाराज यांच्या वरील गुन्हे ताबडतोब रद्द करण्यात यावे ही नम्र विनंती. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रतील वारकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन व महाराष्ट्र शासन असेल.
ह.भ. प.सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, बंडोपंत कुलकर्णी, नागनाथ पाटील, जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष), संजय पवार (शहर अध्यक्ष), मोहन शेळके व सर्व पदाधिकारी यांनी ईमेल द्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले.