सोलापूर : 6 जून शिवराज्याभिषेक दिन तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अवाहनाप्रमाणे व सध्याच्या आपतत्कालिन परिस्थितीचा विचार करुन उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी या गावात येथील लोकनियुक्त महिला सरपंच राधाताई गाडेकर व उपसरपंच उमेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय खरटमल यांच्या पुढाकाराने नरोटेवाडी ग्रामपंचायत मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नरोटेवाडीचे उद्योजक माननीय श्री सिद्धेश्वर काळे मालक यांच्यामार्फत गावातील संपूर्ण कुटुंबाला आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे तसेच मार्डी गावचे सुपुत्र मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री पांडुरंग नवगिरे साहेब यांच्याकडून सामाजिक बांधिलकी म्हणून अडीचशे लोकांना मास्क चे वाटप करण्यात आले.याप्रसंगी सरपंच राधाताई गाडेकर, उपसरपंच उमेश भगत संजय खरटमल,उत्तर सोलापूर तालुका शिवसेना उपप्रमुख बजरंग देवकर, प्रा. डॉ. सदाशिव देवकर, महेंद्र खटके, राहुल गाडेकर ,प्रभाकर उंबरे,सिद्राम धावणे,परमेश्वर पारवे ,भैय्या पाटील, सुजित खटके ,बबलू कोळेकर,मनोज कांबळे व नरोटेवाडीतील ग्रामस्थ व रक्तदाते उपस्थित होते.
या शिबिरात एकूण 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले सोशल डिस्टंसिंगचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यानिमीत्त सोलापूरचे पोलीस अधिक्षक मा.मनोज पाटील साहेब तसेच उत्तर सोलापूर तालुक्याचे तहसीलदार मा. जयंत पाटील साहेब यांनी फोन करुन ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले .