सोलापूर : शाहूनगरात विद्युत मीटर कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. ३ सप्टेंबर रोजी १/सी. शाहूनगर सिटी एक्सटेन्शन, सोलापूर येथे घडली.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी सरस्वती आनंद शिवशरण ( वय -३७ रा.चिंचवड स्टेशन,पुणे) यांचा शाहूनगरात ओपन फ्लॅट आहे.कामानिमित्त ते पुण्याला गेले असता,दि.३ सप्टेंबर रोजी आपल्या प्लॉट कडे पाहणी करण्यासाठी भावाला पाठविले. त्यावेळी भिंतीला लावलेली विद्युत मीटर दिसून आली नाही. व तसेच फिर्यादीच्या भावाने आजूबाजूस शोध घेतला असता विद्युत मीटर मिळून आली नाही. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने एक हजार रुपये किमतीचे विद्युत मीटर चोरून नेल्याचे लक्षात आले.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत.