सोलापूर, (प्रतिनिधी):- कमी व्याजदरात कर्ज मिळवून देतो असे सांगून भामट्या शाम राठोड याने आणखी तिघांची 5 लाख 39 हजाराची फसवणुक केली. ही घटना दि. 25 फेब्रुवारी रोजी घडली.
प्रसाद नवनाथ शिंदे (वय 25, रा. मुपो. अवसरी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिळालेली माहिती अशी की, प्रसाद शिंदे यांचा टेंभुर्णी एमआयडीसी येथे शेतीसाठी लागणाऱ्या ड्रिप तयार करण्याचा कारखाना आहे यांनी कारखान्यात भांडवल घालून व्यवसाय वाढवावा म्हणून कर्ज मिळेल या अपेक्षेने फिरत असताना शाम राठोड याच्याशी भेट झाली प्रसाद शिंदे याचा मित्र अक्षय रासकर (रा. इंदापूर, जि. पुणे) या दोघांना मिळून शाम राठोड याने तिरूपती बालाजी ट्रस्ट फायनान्स, अम्मा भगवान रोड नेमम, तामिळनाडू या फायनान्स कंपनीकडून उद्योग व्यवसायासाठी दिलेल्या कर्जावर वार्षिक 0.5 टक्के व्याजदराने कर्ज देतो आणि तेही कर्ज 15 दिवसात मंजुर करतो असे दोघांना सांगितले त्यावर विश्वास ठेवून दि. 10 नोव्हेंबर 2019 रोजी आबा निगडे यांनी आरोपी शाम राठोड याला उद्योगासाठी 1 कोटी रूपये कर्जासाठी लागणारी प्रोसेसिंग फि म्हणून 77 हजार रूपये दिले. दि. 14 फेब्रुवारी 2020 रोजी अक्षय रासकर यांनी उद्योग व्यवसायासाठी 3 कोटी कर्जासाठी प्रोसेसिंग फि म्हणून 2 लाख 31 हजार रूपये घेतले तसेच फिर्यादी प्रसाद शिंदे याच्याकडून कर्जासाठी प्रोसेसिंग फि म्हणून 2 लाख 31 हजार असे तिघांकडून आरोपी शाम राठोड याने 5 लाख 39 हजार रूपये घेतले आणि कर्ज न देता तिघांची फसवणुक केली. अशी फिर्याद प्रसाद शिंदे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलीसांनी शाम राठोड (रा. प्रताप नगर सोलापूर) याच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.