सोलापूर : सोलापूर शहरात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त दिपक तावरे यांनी शहरातील किराणा दुकानदार,चार चाकी गाडीवरील भाजी विक्रेते,व ज्या ठिकाणी गर्दी होते त्या ठिकाणच्या व्यापारी बंधूंनी मास्क व ग्लोज घालणे बाबतआदेश पारीत केले आहेत.जे व्यापारी आदेशाचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.
त्या नुसार ज्या विक्रेत्यांनी मास्क लावले नाहीत अशा १८ विक्रेत्यांवर वेगवेगळ्या विभागीय कार्यालया कडील आरोग्य निरिक्षका मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- वि का क्र ३ दहा व्यक्ती १००० रु दंड वसुल
- वि का क्र ५ दोन व्यक्ती २००रु दंड
- वि का क्र ७ तीन व्यक्ती ३०० रु दंड
- वि का क्र ८ तीन व्यक्ती
३०० रु दंड, असे आज दि.२५ /०५/२०२०रोजी रक्कम रुपये १८००/-इतका दंड वसुल करण्यात आला. जे लाेक आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांचेवर अत्यंत कडक कारवाई करणेबाबत आदेश देणेत आले आहेत.