- महाविकासआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई : विश्वासात न घेता लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं समोर येतं आहे. मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचं काही मंत्र्यांचं मत आहे.
महाविकासआघाडीचे नेते शरद पवार यांच्याकडे याबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. आज सकाळी शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत चर्चा देखील केली. नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात उद्या भेट होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने राज्यात पुन्हा तेच नियम कायम ठेवत मिशन बीगीन अगेनच्या दुसरा टप्पा लागू केला. पण हा निर्णय घेतांना मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नसल्याचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे.