- देशभरातील नामवंत २४ संघांचा सहभाग, तीन लाखांची बक्षिसे
सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषीमंत्री मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा ङ्गुले समता परिषद, सोलापूर व माऊली प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भव्य लेदर बॉल ’शरद टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. १३ जानेवारीपासून भंडारी स्पोर्टस् क्लब, जुळे सोलापूर येथे करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेचे उद्घाटन १२ वाजता देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, कुलगुरु मृणालिणी ङ्गडणवीस यांच्या हस्ते तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर, माजी आ. राजन पाटील, आ. भारत भालके, आ. यशवंत माने, माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेमध्ये देशभरातील २४ नामवंत संघ सहभाग नोंदविणार आहेत. यामध्ये जम्मु कश्मिर, इंदोर, मुंबई पोलीस, कोल्हापूर, विजयपूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक येथील संघांचा प्रामुख्याने समावेश आहे. एकूण ४०० खेळाडूंना रंगीत पोशाख तसेच राहण्याची व जेवणाची व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे. सोलापुरात प्रथमच भव्य अशी लेदरबॉल स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २ फेब्रुवारी रोजी होणार आहेख, अशी माहिती स्पर्धा प्रमुख प्रशांत बाबर यांनी दिली.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषक १ लाख रु. व चषक, द्वितीय क्रमांकाचे पारितोषक ५१ हजार रु. व चषक, तृतीय क्रमांकाचे पारितोषक २५ हजार रु व चषक तसेच उत्कृष्ट ङ्गलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, मालिकावीर यांना प्रत्येकी १० हजार रूपये रोख व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यांच्या सामनावीरास चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा पांढर्या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशातील नामवंत संघ आणि खेळाडू सहभागी होत आहेत. क्रिडाप्रेमींनी हे क्रिकेट सामने पाहण्यासठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्पर्धेचे स्वागताध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केले आहे.