येस न्युज मराठी नेटवर्क : आज मंत्रालय, मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सोलापूर जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा पालकमंत्री सिलिप वळसे पाटील यांनी घेतला. यात जिल्हाधिकारी सोलापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी,आयुक्त – महानगरपालिका सोलापूर यांचा आढावा घेण्यात आला.
राज्यात आज १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण ११६९ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ४१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ११६९ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. सोलापूर जिल्हाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देऊन सतर्क राहणे बाबत सांगण्यात आले आहे.