कोविड – १९ मुळे आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात बर्याच लोकांवर परिणाम झाला आहे. लॉकडाउन नियम शिथिल झाल्याने आणि सरकारने यासंदर्भात मंजुरी दिल्याने टॉलीवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सीरत कपूर आपल्या पुढच्या प्रकल्पा मध्ये काम करण्या साठी खूप उत्साहित आहे.
अभिनेत्री सीरत कपूर यांनी लोकडाऊन मध्ये आपले अनुभव सांगितले, , ती म्हणाली, “वैयक्तिकरित्या लॉकडाउनचा माझ्यावर बर्याच मार्गांनी परिणाम झाला आहे. लॉकडाऊन आधी आपण आपल्या जीवनाच्या सर्व क्षण आपले स्वप्न पूर्ण करण्यास घालवतो पण हे विसरून जातो कि हे नक्की आपण करतो कोणासाठी आहे. या प्रक्रियेत आपण स्वत: बरोबर पुरेसा वेळ घालवित नाही. ह्या लॉकडाऊन मध्ये आपल्या वर आलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेणे ह्याची समजूत भेटली आहे.लॉकडाऊन नंतर नवीन जीवांची सुरुवात झाली आहे असे वाटत आहे.
वर्क फ्रंटवर, सीरत कपूर तिच्या आगामी ‘माँ विंठा गड विनूमा’ चित्रपटात दिसणार असून लवकरच तिचा आगामी बॉलिवूड शीर्षक नसलेल्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे.