सोलापूर : आपल्या गावी पायीच निघालेल्या आणि विस्थापित झालेल्या मजुरांना सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्यावर अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अख्खा देश लॉकडाऊन करण्यात आला आहे तसेच महामार्गावरील सर्व टोल वसुली देखील बंद करण्यात आली आहे.
रेल्वे नाही ,वाहतूक सेवा नाही तसेच कोणतेच वाहन उपलब्ध नसल्यामुळे शेकडो नागरिक आपापल्या गावाकड पायी चालत झाले आहेत. अशा विस्थापित झालेल्या गोरगरीब मजुरांना टोलनाक्यावर जेवण देण्याची व्यवस्था करावी अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या होत्या .त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर आहे. याबाबत आदेश दिले आहेत त्यानुसार टोलनाक्यावर पायी चालत येणाऱ्या नागरिकांना चहा पाणी तसेच जेवणाची सुविधा देखील करण्यात आली आहे. सावळेश्वर टोल नाक्यावर विशेषता हे चित्र प्रकर्षाने दिसत आहे.