मोहोळ : “वृक्षवल्ली आम्हा सोेयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती’ या संत तुकाराम महाराज यांच्या पर्यावरणपूरक अभंगाने प्रेरित होऊन मोहोळ तालुक्यात ३०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे, अशी माहिती पापरी येथील विश्व वारकरी सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते तुकाराम भोसले यांनी दिली.
पर्यावरणाचे आरोग्य अबाधित ठेवले तरच मानवाचे आरोग्य उत्तम राहणार आहे. निसर्गाचा समतोल, निसर्गचक्र जर व्यवस्थित ठेवायचे असेल तर त्यास वृक्षारोपण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. सारोळे, कोन्हेरी रस्ता शिव परिसरासह अन्य ठिकाणी पर्जन्यमानावर आधारित वाढ होणाऱ्या करंज, कडुलिंब, शॉवर, चिंच अशा ३०० वृक्षांचे रोपण केले. या उपक्रमाला विश्व वारकरी सेना मोहोळ शाखाध्यक्ष हरी लोंढे, कालिदास भोसले, संजय भोसले, शारदा गायकवाड, हनुमंत भोसले, श्रेयस श्रीखंडे, नामदेव नागटिळक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पाळून उपक्रम घेण्यात आला.मोहोळ तालुक्यात विश्व वारकरी सेनेने ३०० रोपांचे वृक्षारोपण केले.