मोहोळ: (दादासाहेब गायकवाड)ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक औषधे उपलब्ध करावीत. या तसेच इतरही प्रमुख मागण्यांसाठीचे निवेदन देण्यात आले.
ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने दि १ जून रोजी विविध मागण्यांचे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले त्यामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. पावसाळयास सुरुवात झाल्यावर रोग पसरण्याची भिती जास्त प्रमाणात असते म्हणुन सॅनेटायझरची फवारणी करुन शहर निर्जतुकीकरण करावे.शहरातील सर्व प्रभागातील गटारी स्वच्छ कराव्यात; सार्वजनिक शौचालय दुरूस्ती व देखभाल करावी.गर्दीच्या ठिकाणी हॅण्डवॉश मशिन ठेवून हात धुण्याची सोय करावी.अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अतूल क्षिरसागर, प्रदेश प्रवक्ता शिलवंत क्षिरसागर, युवक कार्याध्यक्ष सागर अष्टुळ, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शुभम उंबरे, सिद्धार्थ एकमल्ले आदी उपस्थित होते.