सोलापूर : सोलापूर शहरात विनामास्क दुचाकीवर फिरणाऱ्या २४१ वाहनांवर सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून २३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. बुधवारी सकाळ आणि दुपारी अशा दोन सत्रामध्ये एकूण ६४४ वाहने तपासण्यात आली. या कारवाईमध्ये विनामास्क वाहन चालवणाऱ्या २४१ जणांवर कारवाई करण्यात आली. १७ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालवढे सोलापूर शहरात विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ५ वाहनावर कारवाई केली असून त्यांच्याकडून ६ लाख ३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, वैशाली कडुकर यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडून करण्यात आली.