येस न्युज मराठी नेटवर्क राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प ,सोलापूर यांच्या सौजन्याने बालकामगारांचे पुनर्वसनासाठी ज्या ठिकाणी केंद्र चालविण्यात येत आहेत. अशा वस्तीमध्ये राहणाऱ्या 150 विशेष महिला (घटस्फोटीत, विधवा, परितक्त्या) यांच्यासाठी खास संक्रातीनिमित्त नवप्रभात महिला सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .हा कार्यक्रम गुरुवारी दुपारी बारा वाजता सोलापुरातील समाजकल्याण केंद्रात होणार आहे
सर्वसाधारणपणे वर उल्लेख केलेल्या विशेष महिलांना संक्रांत सण, समारंभा मध्ये हळदी-कुंकू तसेच इतर कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जात नाही. या महिलांनादेखील आनंद घेण्याचा हक्क आहे. याशिवाय स्वकर्तुत्वावर निर्भर असणे हेच सर्वात मोठे यश आहे याची जाणीव या महिलांना करून देण्यासाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्यावतीने नवप्रभा महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशा महिलांना हळदी-कुंकू व वाणाचे वाटप करण्यात येणार आहे.
यामुळे समाजाध्ये चांगला संदेश पोहोचविण्याचा छोटासा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. वैशाली कडूकर (पोलीस उपायुक्त, सोलापूर शहर ) डॉ. भारती तडवळकर( स्त्री रोग तज्ञ ) शुभांगी बुवा (संचालिका, पाखर संकुलन) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाटकाच्या माध्यमातून विशेष महिलांचे समाजातील असणारे स्थान व त्यांची होणारी हेळसांड, मानसिक कुचंबणा व त्यातून होणारे समाजपरिवर्तन दाखविणारी नाटीकाची सादरीकरण करण्यात येणार आहे.
तरी पत्रकार बंधूंना विनंती की, वरील कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी व प्रिंट मीडिया मध्ये छापून आणण्यासाठी आपण कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.