येस न्युज मराठी नेटवर्क; नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरातील सामाजिक कार्यकर्ते इरफान मैंदर्गी यांनी नव वर्षाचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धीतने साजरी केले.नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरातील इरफान मैंदर्गी,मालन शेख व अनवर शेख यांनी आपल्या परिसरातील प्रणिती ताई शिंदे प्राथमिक शाळा व अलहुसैन उर्दू प्राथमिक स्कूल आणि श्री संत ज्ञानेश्वर मराठी विद्यालय येथे जाऊन शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन नव वर्षाचे स्वागत करण्यात आलं.एक सामाजिक उपक्रम म्हणून हा कार्यक्रम साजरी करण्यात आलं.ह्या नवनवीन उपक्रमाचे कौतुक शाळेतील मुख्यध्यापक शंकर नालवडे,आदेश यम्बाळ व करीम आहेरवाडी यांनी केले व आभार व्यक्त केले