मुंबई : विठ्ठलाच्या, माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अन त्यामुळे कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. सच्चा वारकरी अशी भूमिका कधी घेणार नाही. त्यामुळे मी फारसं लक्ष देत नाही असा खोचक टोला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला आहे. त्यामुळे अशा लहान सहान गोष्टी होत असतात. दुर्लक्ष करायचे असते असे पवार म्हणाले.
वारकरी परिषदेचे वक्ते महाराज यांनी एक पत्रक जारी केलं होत. यामध्ये त्यांनी शरद पवार हे नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात असा आरोप केला. ‘पवार हे हिंदू धर्माला विरोध करतात. ते रामायणाला विरोध करतात. पवार नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळेच त्यांना यापुढे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलवण्यात येऊ नये; अशा आशयाचं पत्रक महाराजांनी जारी केलं होतं, यावर शरद पवार यांनी आज भाष्य केले.
शरद पवार म्हणाले की, विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला, माऊलींच्या दर्शनाला आळंदीला तर तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अन त्यामुळे कोणी सांगितलं की, तुम्हाला परवानगी नाही. त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही असा खोचक टोला यावेळी शरद पावर यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला नाव न घेता लगावला आहे.