राहुल आपटे/विजयपूर : रस्त्यावरील वाहनांना अडवून लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात विजयपूर पोलीसाना यश मिळाल्याची माहीती जिल्हा वरीष्ठ पोलीस अधिकारी अनूपम अगरवाल यानी पत्रकार परीषद मध्ये दिली. या दरोडा घालणारी ८ जणांची टोळी आहे. सोलापूर चित्रदुर्ग महामार्ग क्रमांक ५० वर मनगोळी रस्त्यावर बसवन बागेवाडी गावातील संगमेश.अगसर, बसवराज मडीवाळर, बसवराज मेटी, शीवानंद शेखप्पा मडीवाळर, बसवराज बिरादार सह अजून दोघे जण टकळ्ळकी गावातील शेखप्पा माडीळर व बसवराज बिरादार व एका अल्पवयीन बालक, हे सर्व २२ मे रोजी रात्री च्या वेळी विजयपूर हून दावणगेरी कडे निघालेला ट्रक मनगुळी येथे अदवून, ट्रक थाबंल्यावर चालक व क्लीनरला चाकू, कोयते दाखवून त्यांच्या कडे असलेले १,२८,०००/- रोख रक्कम व मोबाईल घेउन फरार झाल होते.
या दरोड्याची माहिती ट्रक चालक यानी मनगुळी पोलीस ठाण्यात केली होती. जिल्हा वरीष्ठ पोलीस अधिकारीनी हि बाब गंभीरतेनी घेउन एक विषॆश टिम चि रचना क्ली. आज २६ रोजी पहाटे, २.३० वाजता मनगूळी हाय्वेवर्निसार धाबा जवळ पुन्हा एका दरोडा घालन्याच्या बेतात असताना पोलीस गस्त मध्ये असलेल्या पोलीसाना ते सापडले.
पोलीसानी आपले हात दाखवील्यावर त्यानी वरील ट्रक चालक व क्लिनर ला धमकाउन पैसे लूटल्याचे कबूल केले. याचा तपास अतीरीक्त पोलीस अधिक्षक राम अरसीददी यांच्या मार्गदर्श्नाखाली रचलेल्या टिम बसवन बागेवाडी पोलीस ठाण्याचे उप पोलीस अधिक्षक शांतवीर, सि.पि.आय सोमशेखर जुट्टल, मनगूळी पोलीस ठाण्याचे पि.एस.आय एन.बी.शीवूर, निडगूंडी पि.एस.आय ए.सि.चिक्कोडी, पि.एस.आय बि.एम.बसनगौडर व काही पोलीस यानी भाग घेतला होता.