विजयपूर : येथील जिल्हा हॉस्पीटल मध्ये दोन कोरोना रुग्ण उपचार घेउन बरे झाल्यावर त्यांना सोडणयात आले, आज पर्यंत ४४ रुग्ण बरे झाले असून त्यांना आज सोडणयात आले असल्याची माहीती जिल्हाधीकारी वाय.एस.पाटील यानी दिली. रुग्ण संख्या ५९४ वय २२ युवक, व ८५६ वय २० युवती, हे बरे झाले आहेत त्याना सोडण्यात आले आहेत. अजून २२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आज सकाळच्या हेल्थ बुलेटन मध्ये एक रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आला आहे, रुग्ण संख्या २१३६ ( २८ वय महीला), हि महीला महाराष्ट्रातून आली आहे. आता पर्यंत कोरोना चे ७० केस पॉझीटीव्ह आले आहेत. या पैकी ४४ जण रोगमुक्त झाले आहेत, २२ उपचार घेत आहेत.
जिल्हाधीकारीनी सांगीतले कि विदेशातून व इतर राज्यातून १४,९५४ जण जिल्ह्यात आले आहेत, तर १८६६ जण क्वारोंटेन काळ संपवून घरी गेले आहेत. तर अजून १३,०४२ जण अवधी अजून संपवायची आहे. आता पर्यंत १२,४६६ स्वॅब सॅंपल पाठवीले आहेत, या पैकी ४,२६३ जहवाल नेगीटीव्ह आलेत तर अजून ८१३३ जणांचे स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे अशी माहीती जिल्हाधीकारी वाय.एस.पाटील यानी दिले