सोलापूर – सध्या संचारबंदीमुळे बुधवार पेठ परिसरातील तरटी नाका म्हणजेच रेड लाईट एरिया येथील महिलांना दररोज एक वेळेचे पोटभर जेवण मिळणेही अवघड झाले आहे. त्या अनुषंगाने तेथील 40 महिलांना वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते फळे, भाजीपाला वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बबन शिंदे, अझहर शेख, विकि शेंडगे आदी उपस्थित होते.