मुंबई : लॉकडाउन नियम शिथिल झाल्याने आणि महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात मंजुरी दिल्याने बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्मात्यांनी शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, अनेक सेलिब्रेटी अजूनही बाहेर पडून सेटवर काम सुरू करण्यास संशयी आहेत.
रन राजा रन फेम अभिनेत्री सीरत कपूर त्यापैकी एक आहे, सीरत म्हणाली, “आम्ही आता हळू हळू पण सातत्याने नव्याने सुरुवात करत आहोत आणि काम पुन्हा सुरु करण्यास उत्सुक वाटते. सध्या, मी काही अतिशय रंजक स्क्रिप्ट्स वाचत आहे आणि लवकरच माझ्या नवीन प्रकल्पा बद्दल घोषणा करेन.
वर्क फ्रंटवर, सीरत कपूर तिच्या आगामी ‘माँ विंठा गड विनुमा’ चित्रपटात दिसणार आहे. २०१४ मध्ये बॉलिवूडमध्ये दोन वेगळ्या सिनेमाच्या ‘झिद’ आणि टॉलीवूडमध्ये ‘रन राजा रन’ या सिनेमातून सीरतने अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. टायगर्स , कोलंबस , राजू गारी गढी २ , ओक्का कशनम, आणि टच चेसी चुडू यासारख्या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांमधून तिने सिनेसृष्टीत पदार्पणानंतर टॉलीवूडमध्ये अपवादात्मक कारकीर्द केली आहे.