सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या वर्ष २०१९-२० सालाकरीता नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण प्रसंगी माजी प्रांतपाल मुंबईचे डॉ.बाळकृष्ण इनामदार यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूरचो ८३ वर्षाचा इतिहास गोरवांकित असल्याचे सांगत क्लबच्या रोटरी अन्नपुर्णा योजनेचे विशेष कोतुक केले. ऑनलाईन झालेला ह्या कार्यक्रमास मुंबईहून डॉ.बाळकृष्ण इनामदार ब बीडहून जिल्हा ३१३२ चे प्रांतपाल हरीष मोटवानी यांनी हजेरी लावली. याप्रसंगी मंचावर नुतन अध्यक्ष सुहास लाहोटी, सचिव विशाल वर्मा सह मावळते अध्यक्ष रोटे बी.एस. मुंदडा, सचिव रोटे सीए सुनिल माहेश्वरी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी बी. एस. मुंदडा यांनी उपस्थितांचे स्वागत करीत आपल्या अध्यपदाच्या काळात झालेल्या कार्यक्रमांचा आढावा सादर केला. सचिव रोटे सीए सुनिल माहे श्वरी यांनी फोटोसह विस्तृत सादरीकरण केले. तदपरांत बी. एस. मुंदडा यांनी सुहास लाहोटी यांना अध्यक्षपादाचा तर सीए सुनिल माहेश्वरी यांना विशाल वर्मा यांना सचिवपदाचा पदभार सोपविला. सुहास लाहोटी यांनी पदभार घेतल्यानंतर आपण आपल्या काळात ह्यावर्षी रेन बॉटर हार्वेस्टिंग , आरोग्य तपासणी शिबीर, वरिष्ठ नागरिकांकरीता साक्षरता अभियान, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, किचन गार्डनींग, वृक्षारोपणासह साक्षरता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मानस असल्याचे व्यक्त केला. प्रांतपाल हरीष मोटवानी यांनी ह्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत रोटीह क्लब सद्याच्या कोव्हीड काळात अधिकाधिक समाजापयोगी कामे हाती घ्यावी असे आवाहन केले.
नुतन संचाळक मंडळ खालीलप्रमाणे – उपाध्यक्ष – डॉ. उमा प्रधान, सह सचिव – डॉ. ज्योति चिडगुपकर , क्लब ट्रेनर – सुरेश बिटला सार्जंट अँट आर्म्स – रोटे. अलोक गुप्ता, खजिनदार – सुरज तापडिया, संचालक सर्वश्री डॉ. आनंद कांबळे, आर्कि. प्रशांत सिंगी, डॉ. असित चिडगुपकर, शेळेश डागा, गोवर्धन चाटला , डॉ.संजीव भंडारी,मितेश पंचमिया, पराग कुलकणी, रोटे बी. एस. मुंदडा, सीए सुनिल माहेश्वरी, रोटे. प्रशांत नुले व रोटे. केशव वळसे डॉ. ज्योती चिडगुपकर यांनी प्रमुख पाहुणे डॉ. इनामदार यांची तर संदीप जव्हेरी यांनी प्रांतपाल हरीष मोटवानी यांची ओळख करुन दिली तर सचिव विशाल वर्मा यांनी आभार प्रदर्शन केले. नुतन अध्यक्ष ब सचिव यांची ओळख राजगोपाल मिणियार यांनी करुन दिली.