- रस्त्याचे काम दोन दिवसांत चालू झाले नाही तर राजीनामा देणार
करमाळा : रिटेवाडी या करमाळा तालुक्यातील पुनर्वसित गावाला गेल्या ४० वर्षांपासून रस्ता नाही, लोकसभा निवडणुकीवर गावाने बहिष्कार टाकला,नंतर रस्त्यासाठी १ कोटी ४६ लाख ६४ हजार रुपये निधी मंजूर झाला, काम चालू झाले पण काही दिवसात काम बंद पडले, लवकरात लवकर काम चालू व्हावा या साठी पालकमंत्री, विद्यमान आमदार यांच्याकडे सरपंच दादासाहेब कोकरे आणि आम्ही ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही काही उपयोग झाला नाही, रिटेवाडीतील सर्व ग्रामस्थ १ ऑक्टोंबर पासून उपोषणाला बसलेले आहेत.
ग्रामस्थांना उपोषणाला बसणार आहोत या आशयाचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले, जिल्हाधिकारी,प्रांत, तहसीलदार, पुनर्वसन अधिकारी, कार्यकारी अभियंता. उप अभियंता या सर्वांना निवेदन देण्यात आले होते, तरीही कोणीही दखल घेतली नाही.ग्रामस्थांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे, अधिकारी येतात पोकळी अश्र्वासने देऊन निघुन जातात, जो पर्यंत काम चालू होणार नाही तोपर्यंत रिटेवाडीतील ग्रामस्थ माघार घेणार नाही.उपोषण चालु राहणार आहे,”मी रिटेवाडी गावचा नागरिक या नात्याने जर रस्त्याचे काम दोन दिवसांत चालू झाले नाही तर शासनाचे कोणतेही पद मला नको म्हणुन पोलीस पाटील पदाचा राजीनामा देणार.” असल्याचे रिटेवाडी गावचे पोलीस पाटील अँड. राजेंद्र उध्दव पवार यांनी प्रसन्ना डिजिटलशी बोलताना सांगितले.