सोलापूर : मोडनिंब मधील सामाजिक कार्यकर्ते मा. राहूल दादा केदार यांनी त्यांचे आजोबा विठ्ठल महालिंग सुर्वे यांच्या स्मरणार्थ मोडनिंब जि.प.प्राथमिक शाळेतल्या मुलामुलींना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेला 1 लाख रुपये किंमतीचे मजबूत असे शेड बांधून दिले, त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल शाळेतील विद्यार्थी पालक व शिक्षकातून कौतुक होत आहे. त्यांचा दोन्ही शाळेच्या वतीने आज ट्राॅफी, प्रमाणपत्र, पुस्तक, पुष्पगुच्छ व फेटा बांधून माढा तालुक्यातचे गटशिक्षणाधिकारी मा.फडके साहेबांच्या व मोहोळ चे विस्तार अधिकारी मा.विकास यादव साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी फडके साहेब भाषणात बोलताना म्हणाले की, राहूल केदार यांचा आजच्या तरूण पिढीने खरोखर आदर्श घेण्यासारखा आहे, राहूल केदार यांनी शाळेला जवळ जवळ 1 लाख रुपये किंमतीचे शेड बांधून दिले ही गोष्ट खरोखरच अभिमानास्पद व गौरवाची आहे मोडनिंब चे प्रथम नागरिक तथा सरपंच दत्ता बापू सुर्वे यांनी कौतुक व अभिनंदन केले. गेल्या अनेक वर्षापासून राहूल दादा केदार हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून ते अनेक प्रकारचे नवनवीन सामाजिक उपक्रम सातत्याने घेत असतात यासाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित ही करण्यात आलेलं आहे. आजच्या या उपक्रमामुळे त्यांचे सर्वच स्तरातून मनापासून कौतुक होत आहे.
यावेळी माढा तालुक्यातचे गट शिक्षणाधिकारी फडके, विकास यादव, मनसेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, मोडनिंबचे प्रथम नागरिक तथा सरपंच दत्ता बापू सुर्वे, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास दादा तोडकरी, मोडनिंबचे माजी सरपंच सत्यनारायण गिड्डे, माजी सरपंच नागनाथ ओहोळ, शेतकरी संघटना नेते एकनाथ सुर्वे, RPI चे पश्चिम महाराष्ट्र सचिव कुमार वाघमारे, बहुजन सत्यशोधक संघ अध्यक्ष सुनिल ओहोळ, माजी सरपंच बाबू सुर्वे, माजी सरपंच चांगदेव वरवडे, माजी सरपंच नवनाथ मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटोळे, ग्रामपंचायत सदस्य नागेश माळी, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, युवा नेते सोमनाथ माळी, दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदर्शन कोळी, मोहन कुंभार, दोन्ही शाळेचे उपाध्यक्ष सूचिता पाटील, खडके हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काशीद गुरूजी, लादे, लोंढे, काझी, ढगे, ढोबळे गुरूजी, नाळे, कोंढुभैरी यांनी केले. तसेच यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक बिनगे व गोरे गुरूजी व सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.