सोलापूर: भारत देश हा संस्कृती प्रधान देश असून संत परंपरा असलेला आहे. प्रत्येक प्रांत संत विचाराच्या जडण घडणी तून तयार झालेला आहे. परंतु विज्ञानाच्या गतिशील संस्काराने दिशाहीन बनत चाललेल्या काही जणांकडून संत परंपरेवर व संतांवर आघात होत आहेत. त्याला समूळ नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद च्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवर संघटन सुरु केले आहे. महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पदी ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायातील 29 वर्षा पासूनचे योगदान खूप मोठे असून विविध विषयावर सातत्याने पाठपुरावा केला. शासन दरबारी सांप्रदायिक विषय मांडून वारकरी भाविकांची बाजू निष्ठेने लावून धरली. म्हणून त्यांची ही नियुक्ती होत आहे. असे या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव डॉ.पद्मनाभ गिरी महाराज यांनी सांगितले. विश्वास देशपांडे, उमेश काशीकर यांनी अनुमोदन दिले.