येस न्युज मराठी नेटवर्क : पाटण्याच्या दीघा घाटावर केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.दु:खावेगानं पुत्र चिराग पासवान बेशुद्ध होऊन कोसळले.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार पार पडले. मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. मात्र, यादरम्यान चिराग पासवान दु:खावेगानं बेशुद्ध होऊन कोसळले. दीघा घाटावर आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी कोरोना काळातही हजारोंच्या संख्येनं समर्थन आले होते