मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. आज (२७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रिमंडळासह सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर ही बैठक होत असून, टप्प्याटप्प्यानं लॉकडाउन उठवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.