सोलापूर : सोलापूर मार्कंडेय रुग्णालय या ठिकाणी लोकशाहीरआण्णाभाऊसाठेजयंती व राखीपौणिमेचे औचित्य साधून दलित पँथर व मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोरोना सारख्या जागतीक संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णांची व देशाची सेवा करणारे डाॅक्टर व नर्सेस स्वीपर यांची आज कोवीड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच यावेळी उपस्थित दलित पँथर व मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाध्यक्ष भिमकन्या सामाजिक बहुउद्देशिय संस्थे च्या संस्थापिका प्रणोती शशिकांत जाधव व संघटनेतील पदाधिकारी अनुराधा जाधव नजमुन्निसा मुल्ला यांच्या कडून हाॅस्पिटल मध्ये काम करणारे सफाई कामगार वाॅर्ड बाॅय यांना राखीपौर्णिमे निमित्त राखी बांधण्यात आल्या व मिठाई वाटप करण्यात आली.
यावेळी नगरसेविका राजश्री चव्हाण व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या हस्ते डाॅक्टर व नर्सेस वाॅर्ड बाॅय यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले… याप्रसंगी दलित पँथर सोलापूर जिल्हाध्यक्ष बंडू गवळी, दलित पँथर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रणोती शशिकांत जाधव रूग्णालयाचे चेअरमन डाॅ.माणिक गुरम, व्हाईस चेअरमन तिरूपती विडप रूग्णालयाचे संचालक प्रशांत पल्ली, माजी संचालक अमृतदत्त खिन्न, सोलापूर रूग्णालयाचे डाॅ.अचलेरकर डाॅ.विशाल गोरे डाॅ.रवींद्र गुंडेली डाॅ.सुहास पुजार रूग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी स्वामी आकेन व अरूण गोगी शशिकांत अजय गायकवाड व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.