सोलापूर : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप(दादा) गारटकर यांच्या मार्फत रमजान ईद च्या निमित्ताने इंदापूर शहारातील विविध भागातील ७८६ मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक किट वाटप करण्याची मागील २८ वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही कायम ठेवली असून सोशल डिस्टन्स ठेवून शनिवार (दि२३) रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय(मामा) भरणे व विधानसभा प्रतोद मोहोळचे आमदार यशवंत(तात्या) माने व राष्ट्रवादी कॉग्रेस चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र कार्य करणारे इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी तसेच इंदापूर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. शिवाय इंदापूर बसस्थानकामध्ये गोरगरिबांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी चे उद्घाटन ही करण्यात आले. यावेळी नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.