सोलापूर : प्रभाग 26 मधील रचना सोसायटी व रुबी नगर येथे कोरोना व सारी चे रुग्ण मिळून आल्याचे समजताच प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी अग्निशामक अधीक्षक आवटे यांना सदर नगरांमध्ये निर्जंतुक सॅनिटायझर फवारणी करण्याकरिता सांगितले होते. त्याची दखल घेत अग्निशामक दलातील कर्मचारी यांनी सदर नगरात निर्जंतुक फवारणी केली व संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्यात आले त्यावेळी नगरातील शिवा वाघमारे, नागेश शिंदे, आकाश जाधव. आदीसह नगरातील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले.