येस न्युज मराठी नेटवर्क :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण 21 जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहिबाई पोपेरे आणि अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार,गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले मान्यवर
राहीबाई पोपेरे (कृषी क्षेत्रातील कार्य),पोपटराव पवार (जलसंधारण), जगदीप लाला आहुजा (सामाजिक कार्य) ,मोहम्मह शरीफ (सामाजिक कार्य)
,जावेद अहमद टाक ( दिव्यांगासाठी कार्य) ,तुलसी गौडा (पर्यावरण) ,सत्यनारायण मुंदायूर (शिक्षण क्षेत्रातील कार्य) ,अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य)
,उषा चौमूर (सामाजिक कार्य) ,हरेकला हजब्बा (शिक्षण क्षेत्रातील कार्य) ,अरुणोदय मंडल (आरोग्य क्षेत्र),राधामोहन आणि साबरमती (कृषी क्षेत्रातील कार्य) ,कुशल कोनवार सरमा (प्राण्यांसाठी कार्य) ,त्रिनीटी साईओ (कृषी क्षेत्रातील कार्य) ,रवी कन्नन (आरोग्य),एस रामकृष्णन (दिव्यांगांसाठी कार्य)
,सुंदरम वर्मा (पर्यावरण) ,मुन्ना मास्टर (कला) ,योगी अॅरोन (आरोग्य क्षेत्रातील कार्य), हिंमत राम भांभू (पर्यावरण कार्य), मुजीक्कल पंकजाक्षी (कला क्षेत्र)