• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

यंदा देशात तांदूळ मुबलक

by Yes News Marathi
October 13, 2020
in मुख्य बातमी
0
यंदा देशात तांदूळ मुबलक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 येस न्युज मराठी नेटवर्क : देशभरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने भाताची लागवड चांगली झाली आहे. देशात भाताच्या धानाची लागवड ३९० लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात तांदळाचे उत्पादन मुबलक होऊन दरातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाताचे मुबलक उत्पादन झाल्यास भावात घट होण्याची शक्यता मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी जयराज अँड कंपनीचे संचालक आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर देशभरातील भात उत्पादक शेतकरी लागवडीस सुरुवात करतात. लागवड झाल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत भाताचे पीक हाती येते. भाताच्या लागवडीस कमी कालावधी लागतो. त्यामुळे देशभरातील शेतकरी भात लागवडीला प्राधान्य देतात. भाताच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदाच्या हंगामात सुद्धा देशात भाताची लागवड विक्रमी झाली आहे.

गेल्या वर्षी देशभरात भाताची लागवड ३५४.५० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. त्यातून तांदळाचे उत्पादन ११ लाख ७५ हजार टन एवढे मिळाले होते. गेल्या वर्षीचे उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या हंगामात संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भात धान लागवडीचे प्रमाण दहा टक्क्य़ांनी वाढले आहे. लागवड वाढल्यानंतर साहजिकच सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरात घट होईल, असे त्यांनी नमूद केले.

Previous Post

१०० रुपयांच्या नाण्याचे आज अनावरण

Next Post

भाजपा नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात…

Next Post
भाजपा नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात…

भाजपा नेते किरीट सोमय्या पोलिसांच्या ताब्यात…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group