मोडनिंब : मुंबई , पुणे येथुन आंध्र , तामीळनाडू येथे जाणाऱ्या लोकांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेऊन मोडनिंब येथील उमा विद्यालयात रहाण्याची सोय करण्यात आली आहे .आज माढ्याचे तहसिलदार चव्हाण यांनी भेट दिली. या प्रवाशांची आस्थेने विचारपुस केली. याप्रसंगी मोडनिंब चे सर्कल भाऊसाहेब सुरवसे तलाठी महेश राऊत सरपंच दत्ताबापू सुर्वे बापूराव देवकते रिपाइ चे कुमार वाघमारे मा.सरपंच सदाशिव पाटोळे आदि उपस्थित होते. या प्रवाशांच्या देखरेखी साठी दोन पोलिस कर्मचारी तैनात असून महसुल विभाग , सहयोग मित्र परिवार व मोडनिंब ग्रामस्थांच्या सहकार्यातून या प्रवाशांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
मुंबई पुणे येथुन निघालेले हे प्रवाशी काही जण चालत तर काही जण दुचाकी वरुन आंध्र, कर्नाटक, आळंद या आपल्या गावाकडे परतत होते.त्यांना टेंभुर्णी पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर मोडनिंब येथील उमा विद्यालयातील निवासस्थानी रवानगी करण्यात आली. या सर्व प्रवाशांची आरोग्यवर्धिनीचे वैद्यकीय आधिकारी थोरात यांनी तपासणी केली .यावेळी त्यांना कोरोनाची कोणतेही लक्षणे नसल्याचे सांगितले .यामध्ये महिलांचाही समावेश आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत आता हे प्रवाशी मोडनिंब च्या उमा विद्यालयात रहातील असे चित्र आहे.