येस न्युज मराठी नेटवर्क : महाडिक महाविद्यालयाच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असून यापुढील काळातही कसल्याही प्रकारची मदत लागल्यास आपण ती करु ” असे आश्वासन माढा तालुक्याचे आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.मोडनिंब मधील मा.ह.महाडिक महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजात केलेल्या ‘ माजि विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार विनायकराव पाटील होते.याप्रसंगी माजी आमदार धनाजी साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आ.शिंदे पुढे म्हणाले की ‘ कायम विनाअनुदानित या तत्वावर सुरु केलेल्या या महाविद्यालयातील प्राध्यापकांना वेतन मिळण्याकरता अडचण निर्माण होत होती त्यामुळे शरद पवार साहेबांच्या सहकार्याने व आपण हा कायम विनाआनुदानित ‘ कायम ‘ हा शब्द काढून वेतन मिळण्यासाठीचा मार्ग सुकर केला असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना मा.साठे म्हणाले की ‘ ग्रामीण भागातील तील विद्यार्थ्यांचे या महाविद्यालयामुळे उच्च शिक्षणाची सोय झाली असून मी , विनायक बापू व आ.शिंदे या तिघांच्या प्रयत्नामुळे कै.महाडिक तात्यांचे महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण केले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात उमाबाईसाहेब पटवर्धन व महाडिक तात्यांच्या प्रतिमापूजनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष मनोहर डोंगरे सचिव शिवाजी पाटील संचालक राजेश पाटील जंबूलाल दोभाडा मिलिंद दाते प्रमुख वक्ते प्रा .तुकाराम मस्के सरपंच दत्तात्रय सुर्वे मा.सरपंच चांगदेव वरवडे राष्ट्रवादीचे संतोष पाटील दूध संघाचे शंभू मोरे आदि मान्यवर उपस्थित होते .याप्रसंगी १९९३ पासूनचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य दादासाहेब शिंदे ,एस.टी.पाटील सुहास पाटील ,गायकवाड , पोपट भांगे , क्रिडा विभागाचे देशमुख आदिनी परीश्रम घेतले.