मैंदर्गी : मैंदर्गीतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये आज रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या “आर्सेनिक अल्बम 30” या होमिओपॅथिक गोळ्या मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी नगरसेवक सिद्धाराम बिराजदार यांनी मागणी केली होती. सुभाष गल्लीचा काही भाग, निंगदळी गल्ली, या क्षेत्रात गोळ्या मोफत वाटप करण्यात आल्या. यावेळी त्या भागातील इमरान तडमुड, दिवटे, अळगी व नगरपरिषदचे कर्मचारी यांच्या मदतीने नागरिकांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या गोळ्या सर्वांना उपयुक्त आहेत. बीपी किंवा शुगर असणाऱ्यांनी देखील या गोळ्या घ्याव्यात. सुभाष गल्ली भागात वाटप केल्यानंतर टप्प्याटप्याने प्रभागातील अजून काही भागात गोळ्या उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.