सोलापूर : माढा तालुक्यातील रिधोरे सारख्या ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून सोलापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी ते पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदापर्यंत मजल मारलेल्या साहेबराव गायकवाड यांचे गुरुवारी सकाळी पुण्यात अचानक निधन झाले. ते 48 वर्षांचे आहेत. नुकतीच त्यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे