गणेश जाधव/जालना : मुंबई येथून काही दिवसांपूर्वी पोहचलेल्या जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथील 27 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी याच महिलेच्या पतीसह मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालेला असून त्यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता जिल्ह्याची एकूण संख्या 77 इतकी झाली असून आतापर्यंत 18 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याचे या सुत्रांनी सांगितले आहे