मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे असलेले CRPF चे आणखी सहा जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली आहे. केंद्रीय सुरक्षा बल अर्थात CRPF च्या आणखी सहा जवानांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना याआधीच करोना झाल्याचे समजले होते. आता आणखी सहा जणांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.